‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक समीकरणेच बदलून टाकली आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या मराठी चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. आता सैराट पाठोपाठ तमाम जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या आणखी एका मराठी चित्रपटाचा रिमेक येणार आहे. हा रिमेक बॉलिवूडचा भाईजान करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सलमान खान मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या चित्रपटाचा रिमेक करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न’ आहे. तसेच हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या हिंदी रिमेकमध्ये सलमान सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Subah ki coffee aur sooraj!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

आणखी वाचा : शत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमयेने साकारलेली पोलिसाची भूमिका सलमान रिमेकमध्ये करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा : ‘कुछ तो गड़बड़ है…’ म्हणणाऱ्या दया, फ्रेड्री आणि अभिजीतचीच फसवणूक

जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे. २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान आणि अरबाज खानसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. त्यामुळे त्यांनी तेव्हाच या चित्रपटाचा हिंदी रिमेकचा विचार  केला होता. आता ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात हिंदी रिमेक पाहाला मिळणार असल्याने चाहते आनंदी आहेत.

Story img Loader