सलमान खानची ईद पार्टी बॉलिवूडच्या काही खास पार्ट्यांपैकी एक आहे. ईदच्या दिवशी सलमान खान बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रेटींनी आपल्या घरी बोलवतो आणि ग्रँड पार्टी देतो. सलमान खानच्या या पार्टीची सोशल मीडियावर देखील चर्चा होते. पण यंदा मात्र सलमानच्या घरी ईद सेलिब्रेशन होणार नाहीये. काही वेबसाईट्सनी दिलेल्या वृत्तानुसार यंदा सलमान खान त्याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटवर ईद साजरी करणार नसून या पार्टीचं सेलिब्रेशन लोकशन बदलण्यात आलं आहे.

सलमान खानचं यंदाचं ईद सेलिब्रेशन खूपच वेगळं असणार आहे. नेहमीच ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणाऱ्या भाईजानचा कोणताही चित्रपट यावेळी प्रदर्शित होत नाहीये. अशात यंदाच्या ईदचं सेलिब्रेशन सलमान त्याच्या घरी नाही तर बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी करणार आहे. रिपोर्टनुसार संपूर्ण खान कुटुंबीयांनी यंदाची ईद अर्पिताच्या घरी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

आणखी वाचा- “तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव…” मंजिरी ओकच्या वाढदिवशी अमृता खानविलकरची खास पोस्ट

सूत्रांच्या माहितीनुसार या पार्टीसाठी अर्पिता आणि आयुष यांनी सर्व पाहुण्यांना निमंत्रण दिलं आहे. या सेलिब्रेशनची तयार त्यांच्या घरी मोठ्या उत्साहात सुरू आहे. जेव्हा पासून अर्पिता आणि आयुषचं लग्न झालंय तेव्हापासून दोन्ही कुटुंब सर्वच सण एकत्र साजरे करताना दिसतात. पण आयुष आणि अर्पिता आई-बाबा झाल्यानंतर दोन्ही कुटुंबं आपल्या मुलांसोबत सर्व सण त्यांच्या घरी साजरे करताना दिसतात.

आणखी वाचा- “…म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला” Lock Upp मध्ये अंजली अरोराचा धक्कादायक खुलासा

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं काही शूटिंग बाकी असून सलमान सध्या या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला यांचा आगामी चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाली’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आयुष शर्मा आणि शहनाझ गिल यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

Story img Loader