सुपरस्टार सलमान खान त्याच्या प्रत्येक चित्रपटागणिक बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, असे असले तरी ‘जय हो’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबाबत त्याला चिंता लागून राहिली आहे. सलमान खानला ‘जय हो’ हा चित्रपट मनापासून आवडला असून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करावी, असे त्याला वाटते आहे. या विषयी बोलताना तो म्हणतो, अभिनेत्याला खूप आवडलेल्या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी न केल्याचे बोलले जाते. आत्तापर्यंत तरी माझ्याबरोबर असे झालेले नसले, तरी अशी एक वेळ येईल जेव्हा माझ्याबरोबरसुद्धा असे होईल. मला हा चित्रपट खूप आवडला असल्याने, या चित्रपटाबाबत माझ्याबरोबर असे होऊ नये, अशी माझी मनोमन इच्छा आहे. चित्रपटात भरपूर साहसी दृष्य, विनोद आणि रोमान्स वगैरे ठासून भरलेला असला, तरी हा चित्रपट आधीच्या माझ्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.
‘जय हो’ चित्रपटाचे दिग्दर्शन सोहेल खानचे असून, चित्रपटात सलमान खान, तब्बू, डॅनी डेन्झोप्पा, डेझी शहा (नव-अभिनेत्री), सना खान, सुनील शेट्टी आणि अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘स्टेलीन’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘जय हो’च्या बॉक्स ऑफिस यशाच्या चिंतेने सलमानला ग्रासले
सुपरस्टार सलमान खान त्याच्या प्रत्येक चित्रपटागणिक बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, असे असले तरी 'जय हो' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबाबत...
First published on: 22-01-2014 at 06:14 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसलमान खानSalman Khanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan worried about the box office fate of jai ho