अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला बहुचर्चित सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ने पहिल्या पाच दिवसांत १५० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शुक्रवारी बजरंगी भाईजान देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खानची भूमिका असल्यामुळे तसेच त्याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आल्यामुळे तो किती कोटींचा व्यवसाय करतो, याकडे चित्रपट क्षेत्रासोबत सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.
पहिल्या पाच दिवसातील कमाईबद्दल बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अभ्यासक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘बजरंगी भाईजान’ने कमाईचा वेग कायम ठेवला आहे. गेल्या शुक्रवारी पहिल्या दिवशी २७.२५ कोटी रूपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर शनिवारी ३६.६०, रविवारी ३८.७५, सोमवारी २७.०५ आणि मंगळवारी २१.४० कोटी रूपयांचा व्यवसाय केला. आतापर्यंत या चित्रपटाने १५० कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे.
पाच दिवसांत ‘बजरंगी भाईजान’ची १५० कोटींची कमाई
अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला बहुचर्चित सिनेमा 'बजरंगी भाईजान'ने पहिल्या पाच दिवसांत १५० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे.
First published on: 22-07-2015 at 04:21 IST
TOPICSबजरंगी भाईजान
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans bajrangi bhaijaan collects rs 150 cr in five days