अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ने तीन आठवडे पू्र्ण होण्याआधीच ३०० कोटींची कमाई केली आहे. आमीर खानच्या ‘पीके’ नंतर तीन आठवड्यांच्या आत एवढी कमाई करणारा ‘बजरंगी भाईजान’ दुसऱया क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे.
गेल्या महिन्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर १७ जुलै रोजी बजरंगी भाईजान संपूर्ण देशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यांतच २५० कोटींची कमाई केली होती. तिसऱय़ा आठवड्यातही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि अवघ्या २० दिवसांत ३०० कोटींचा व्यवसाय केला. बॉक्स ऑफिस अभ्यासक तरण आदर्श यांनी गेल्या शुक्रवारपासून या चित्रपटाने केलेल्या कमाईचे ट्विट केले आहे.

Story img Loader