बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या शिर्षकावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या बजरंगी भाईजान या शिर्षकाला विरोध करीत विहिंप आणि बजरंद दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निदर्शनं केली. विहिंप आणि बजरंग दलाने चित्रपटाचे शिर्षक बदलण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास देशभर चित्रपटाविरोधात आंदोलन तीव्र करून चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबविण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील एका स्थानिक कार्यकर्त्याने याबाबतची याचिका दाखल केली असून सलमान खान, चित्रपटाचा दिग्दर्शक कबिर खान आणि यशराज फिल्मला नोटीस देखील धाडली आहे.

Story img Loader