बॉलीवूडचा ‘दबंग खान’ सलमान हा नेहमीच चौकटीच्या पलकडीकडे जाऊन काहीतरी हटके करण्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकतीच त्याने एक बिर्याणी पार्टी दिली.
‘बजरंग भाईजान’च्या सेटवर सलमानने चित्रपटातील कलाकार आणि सहका-यांना बिर्याणीची पार्टी दिली. त्यापूर्वी त्याने ‘प्रेम रतन धन पायो’च्या सेटवरही बिर्याणी पार्टी केली होती. ‘बिग बॉस’ सोडल्यापासून सलमान हा ‘बजरंग भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या दोन चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात सध्या व्यस्त आहे. त्यातूनही आपल्या सहका-यांसाठी काही तरी वेगळं करण्यासाठी तो विसरत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगी भाईजानचे जोरदार चित्रीकरण सुरु असतानाच सलमानने त्याच्या खासगी स्वयंपाकीस बिर्याणी आणि इतर मटणाचे पदार्थ करण्यास सांगितले. चित्रपटातील सहका-यांनीही या मेजवानीचा भरपेट आनंद लुटला.

Story img Loader