सलमानची धाकटी बहिण अर्पिता ही काही दिवसांपूर्वीच आयुष शर्माशी लग्नगाठीत अडकली. सलमान, अरबाज आणि सोहेल खान यांच्या भावजी असलेल्या आयुषला अभिनेता बनण्याची इच्छा आहे. हे केव्हा आणि कसे होईल हे माहित असे अभिनेता-निर्माता अरबाज खान म्हणाला.
अर्पिताचा नवरा आयुष चित्रपटसृष्टीत येण्यास इच्छुक आहे का असा प्रश्न विचारला असता अरबाज म्हणाला की, आयुष दिसायला दिमाखदार आहे. तो चित्रपटांमध्ये येण्याची इच्छा असून त्याला अभिनेता बनायचेय. केव्हा आणि कसं त्याला लॉन्च करणार ते माहित नाही. पण माझ्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत.
अरबाज सध्या त्याच्या आगामी ‘डॉली की डोली’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त आहे. अभिषेक डोग्रा दिग्दर्शित या चित्रपटात सोनम कपूरची मुख्य भूमिका आहे.

Story img Loader