नुकताचं सलमानची बहिण अर्पिता खानचा वाढदिवस साजरा झाला. तिच्यापाठोपाठ अरबाजचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे खान कुटुंबिय सध्या सेलिब्रेशन करण्यात व्यस्त असल्याचे दिसते. पण, हे सेलिब्रेशन इतक्यावरचं थांबलेले नाही. कारण लवकरचं हे कुटुंब एका लग्नसोहळ्यालाही उपस्थिती लावणार आहेत. सलमानची बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्माचा भाऊ आश्रय हा लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याची बहिण राधिका आणि आश्रयचे लग्न ठरले आहे. आता राधिका ही अर्पिताची जाऊ होणार आहे. त्यामुळे गंभीर हा नकळत सलमानच्या कुटुंबाचा भाग होईल.
आश्रयचा स्वतःचा बिझनेस असून, राधिका ही स्टायलिस्ट आणि फॅशन ब्लॉगर आहे. या दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा लवकरचं करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in