सलमान खानची मेंटल चित्रपटातील सहअभिनेत्री सना खान हिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तिच्यावर १५वर्षीय मुलीच्या अपहरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. मॉडलिंगमधून अभिनयाकडे वळलेल्या २५वर्षीय सना खानने नुकताच बिंग बॉस या रिअॅलिटी गेम शोमध्ये सहभाग घेतला होता. ती काही जाहिरातींमधूनही प्रसिद्धिस आली होती.
सनाचा चुलत भाऊ नावेद याने एका १५ वर्षाच्या अल्पलयीन मुलीस लग्नाची मागणी घातली होती, पण त्यास तिने नकार दिला होता. सदर मुलीच्या अपहरणात सहभागी असल्याच्या आरोपावरुन पोलीस सनाचा शोध घेत होते. याप्रकरणी जेव्हा सनाचा भाऊ नावेद याला त्याच्या क्षितीज दुबे आणि विस्मीत आंब्रे या दोन मित्रांसह पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, तेव्हा सना खान स्वतःचा मोबाईल फोन बंद करुन फरार झाली होती.