बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुपरस्टार सलमान खान. सलमान त्याच्या कूल लूकमुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमी जीन्स आणि टी-शर्ट परिधान केलेला पाहायला मिळतो. परंतु सलमानने फॉर्मल कपडे परिधान केल्याचे फारसे दिसत नाही. तसेच अनेकदा त्याला काळ्या रंगाच्या कपड्यात पाहिले गेले. पण हे काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यामागे सलमानचे खास कारण असल्याचे त्याच्या डिझायनरने सांगितले आहे.
डिझायनर अॅश्ले रेबेलो हा सलमानचा ड्रेस डिझायनर आहे. त्याने सलमानच्या ड्रेसिंग स्टाईल संबंधात सोशल मीडियावर चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. त्यादरम्यान एका चाहत्याने ‘सलमानची ड्रेसिंग स्टाईल बदला आणि तो नेहमी काळ्या रंगाचे कपडेच का परिधान करतो’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर अॅश्लेने मजेदार अंदाजात प्रत्युतर दिले की, ‘कारण सलमानला आणखी कोणता रंग आवडतच नाही.’ अॅश्लेच्या या वक्तव्यामुळे सलमानच्या काळ्या रंगाच्या कपड्यांमागचे रहस्य समोर आले आहे.
सध्या सलमान ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच सलमानचा ‘भारत’ चित्रपटचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाल आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्याचा हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.