बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘जय हो’ चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच तिकीट बारीवर ६० कोटींचा आकाडा पार केला आहे. अर्थात सलमानच्या ‘जय हो’ सोबत दुसरा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता याचा फायदा ‘जय हो’ला झाला असल्याचे म्हटले तरी, सलमानची लोकप्रियताही तितकीच असल्याने हा चित्रपट पाहण्यासाठी सलमान चाहते उत्साहाने गर्दी करतात यातही तितकीच सत्यता आहे.
इरॉसकडून पुष्टी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, ‘जय हो’ने शुक्रवारी १७.७५ कोटी, शनिवारी १६.६८ व रविवारी २६.२५ कोटी अशी एकूण मिळून ६०.६८ कोटींची कमाई केली आहे. ही आकडेवारी फक्त भारतातील आहे. या आकडेवारीनुसार सलमानचा ‘जय हो’ पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणाऱयांमध्ये १२व्या स्थानी आहे.
याआधी २०१० साली सलमानचाच ‘एक था टायगर’ने पहिल्या तीन दिवसात १००.१६ कोटी कमाविले होते. तसेच शाहरूख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसने १००.४२ कोटी, आमिर खानच्या धूम-३ने १०७.०२ कोटींचा गल्ला पहिल्या तीन दिवसांत कमाविला होता.
‘जय हो’च्या सध्याच्या तिकीट बारीनुसार हा चित्रपट तितकासा किंवा नवा काही विक्रम गाठेल अशी अपेक्षा नसल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तविले आहे.
तीन दिवसात ‘जय हो’चा ६० कोटींचा गल्ला!
बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित 'जय हो' चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच तिकीट बारीवर ६० कोटींचा आकाडा पार केला आहे. अर्थात सलमानच्या 'जय हो' सोबत दुसरा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता
First published on: 27-01-2014 at 07:43 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans jai ho collects rs 60 core in opening weekend