सुपरस्टार सलमान खानच्या छोट्या चाहत्यांना जय हो चित्रपट आता एकट्याने चित्रपटगृहात पाहता येणार नाही. त्यांना ‘जय हो’ पाहण्यासाठी आपल्या पालकांना सोबत घेऊन जावे लागण्याची शक्यता आहे. ‘जय हो’ चित्रपटाला ‘यू/ए’ सर्टिफिकेट मिळाले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावून जय हो ला ‘यू/ए’ सर्टिफिकेटसह हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे १२ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले हा चित्रपट एकटे पाहू शकत नाही.
सलमानचे इतर चित्रपट ‘यू’ सर्टिफिकेटसह प्रदर्शित झाले आहेत. पण त्याची मुख्य भूमिका असलेल्या ‘जय हो’मध्ये राजकारणही दाखवण्यात आले आहे. सध्याच्या राजकारण्यांवर कटू भाष्य करण्यात आले आहे. भ्रष्टाचारी नेत्यांना चित्रपटात शिवीगाळ केल्याचा आणि भ्रष्ट नेतागिरीवर टिप्पणी केल्याचे, सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटात कोणतेही अपमानास्पद संवाद नाहीत. सलमान पडद्यावर शिव्या देत नाही. पण चित्रपटात सध्याच्या राजकारणावर अशी टिप्पणी आहे की, ज्याने राजकारणी बेचैन होऊ शकतात. याच दृश्यांना कात्री लावण्यात आली आहे. त्याचबरोबर मारहाणीचे काही लांबलचक दृश्यही हटवण्यात आले आहेत.
चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यात आल्यानंतर ‘यू/ए’ सर्टिफिकेट मिळणारा सलमानचा हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
सलमानच्या छोट्या चाहत्यांना पालकांसोबत पाहावा लागणार ‘जय हो’!
सुपरस्टार सलमान खानच्या छोट्या चाहत्यांना जय हो चित्रपट आता एकट्याने चित्रपटगृहात पाहता येणार नाही.
First published on: 20-01-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans jai ho gets ua certificate with cuts