सलमानवर २००२ साली दारुच्या नशेत गा़डी चालवून पदपथावर झोपलेल्या एका नागरिकाच्या मृत्यूप्रकरणाचा ‘हिट अॅण्ड रन’ खटला चालू आहे. काही दिवसांपूर्वी राजश्री प्रॉडक्शनने सलमानसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सलमानवर चालू असलेल्या कायदेशीर प्रकरणांमुळे या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत राजश्रीच्या अधिकृत प्रवक्त्याकडे विचारणा केली असता सलमानच्या कायेदेशीर खटल्याचा चित्रपटावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्याने सांगितले. ” अशा खटल्यांच्या निकालास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे आम्ही सलमानसोबत नक्कीच हा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करु. अद्याप इतर कलाकारांची निवड करणे बाकी असून सलमानचे नाव चित्रपटासाठी निश्चित करण्यात आले आहे. सदर चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुऱु करण्याची शक्यता आहे. तसेच, सध्या आम्ही चित्रपट निर्मिती पूर्वीच्या कामात गुंतलेलो असून लवकरच चित्रपटाबाबतची अधिकृत घोषणा करु”, असेही प्रवक्ता म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans legal case will not affect his film with barjatyas