सलमान खानच्या निर्मिती संस्थेद्वारे बनत असलेला ‘ मेंटल’ हा चित्रपट २४ जानेवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा हा चित्रपट ‘ स्टॅलिन’ या प्रसिद्ध तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. ईद दरम्यान आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सलमानचा हा चित्रपट यावेळी मात्र काही आरोंग्यविषयक आणि कायदेशीर बाबींमुळे प्रजासत्ताकदिनाच्या आसपास प्रदर्शित होत आहे.
सलमानने सदर चित्रपटाचे चित्रीकरण प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण करुन प्रदर्शित करण्याचा आग्रह सोहेल खानला केला आहे. सोहेल खानला याबाबत विचारले असता त्याने ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. तसेच आम्ही सतत चित्रीकरणाचे काम करत असून, तात्पुरती २४ जानेवारी ही चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित केली असल्याचे सांगितले.

Story img Loader