बॉलीवूडमध्ये एकेकाळचे चांगले मित्र मात्र सध्याचे शत्रू सलमान आणि शाहरुख यांची पुन्हा एकदा गळाभेट झाली आहे. स्टार गिल्ड पुरस्कार २०१४च्या सूत्रसंचलनाची सूत्रे यंदा सलमानच्या हाती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या इफ्तार पार्टीत या दोघांनी आपले पाच वर्षांचे वैमनस्य संपवले होते. त्यानंतर आता पुरस्कार सोहळ्यात शाहरुखला दीपिकाच्या हस्ते ‘एन्टरटेनर ऑफ द इयर’चा पुरस्कार देण्यात आला तेव्हा या दोघांनी गळाभेट केली.
फोटो गॅलरीः सलमान-शाहरुखचे पुन्हा मनोमिलन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने सर्वात प्रथम ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशाकरिता शाहरुखचे अभिनंदन केले. त्यावेळी शाहरुख सुरुवातीच्या मान्यवरांच्या पंगतीत बसला होता. तसेच, त्याने चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता शाहरुखला ‘जय हो’ बोलण्याबद्दलही विचारणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इफ्तार पार्टीच्या मनोमिलनानंतर हे दोन्ही खान कुठेच एकत्र झळकले नाहीत. तसेच, कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये शाहरुख आणि आपण यापुढे बेस्ट फ्रेण्ड्स होऊ शकत नाही, असे सलमान म्हणाला होता. सलमानच्या वडिलांनाही या दोघांमध्ये मैत्री होऊ शकत नाही कारण ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत असे म्हटले होते. २००८ साली कतरिनाच्या बर्थडे पार्टीत झालेल्या वादानंतर या दोन्ही खानांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते.