काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्यने घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. जवळपास लग्नाच्या ४ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी घटस्फोट का घेतला या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. घटस्फोटाची बातमी सांगितल्यानंतर समांथाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. समांथा देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला खडेबोल सुनावले असून अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने समांथाला पाठिंबा दिला आहे.
समांथाने ट्विटरवर “काही जण माझ्याबद्दल फार अफवा पसरवत आहे. माझे अफेअर चालू होते. मला मूल नको होते. मी फार संधीसाधू आहे आणि माझा गर्भपात झाला आहे, यासारख्या गोष्टींची चर्चा माझ्याबद्दल सुरु आहे” या आशयची पोस्ट केली होती. तिने या पोस्टद्वारे ट्रोलर्सला सुनावले होते. तिचे हे ट्वीट अभिनेत्री रकुल प्रित सिंहने रिट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये तिने हार्ट इमोजी वापरले असून समांथाला पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा : घटस्फोटानंतर २०० कोटी रुपयांची पोटगी समांथाने का नाकारली?
काय होती समांथाची पोस्ट?
“माझ्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक संकटानंतर तुम्ही दिलेल्या भावनिक आधारामुळे मी फार भारावली आहे. माझ्याबद्दल इतकी दया दाखवल्याबद्दल आणि माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि इतर विचित्र गोष्टींपासून माझे संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद. काही जण माझ्याबद्दल फार अफवा पसरवत आहे. माझे अफेअर चालू होते. मला मूल नको होते. मी फार संधीसाधू आहे आणि माझा गर्भपात झाला आहे, यासारख्या गोष्टींची चर्चा माझ्याबद्दल सुरु आहे. पण घटस्फोट ही स्वतःच एक वेदनादायक प्रक्रिया आहे. यावर मात करण्यासाठी मला एकटे सोडा. माझ्यावर केले जाणारे हे वैयक्तिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण, तुम्ही तुम्हाला हवं ते बोला, पण तुम्ही मला तोडू शकणार नाही,” असे समांथाने खडसावले.