दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि पती नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात फूट पडल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान, समांथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे.

समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, बराच विचार केल्यानंतर मी आणि चै(नागा चैतन्य)ने पती-पत्नीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहोत आणि आमच्यात असलेल हे नात कायम राहिलं. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात ते आम्हाला पाठिंबा देतील आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,” अशा आशयाची पोस्ट समांथाने केली आहे. समांथाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

आणखी वाचा : ऐश्वर्याचे आराध्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

समांथाने नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर अक्किनेनी हे आडनाव लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी समांथाने तिचं हे आडनाव सोशल मीडियावरून हटवलं होतं. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. समांथाने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर असलेल्या डिस्प्ले नावातून अक्किनेनी नाव हटवत केवळ ‘S’ (एस) हे अक्षर ठेवलंय.

आणखी वाचा : रणवीर सिंहने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत अर्जुन कपूरने केले ट्रोल म्हणाला…

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडण्याचे कारण समांथाचे चित्रपट आणि करिअरवर असलेले तिचे प्रेम आहे. लग्नानंतरही समांथा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि ग्लॅमरस फोटोशूट करत राहते. पण पती नागा चैतन्य आणि तिचे सासरे नागार्जुन यांना हे आवडत नाही. दोघेही समांथाला तिचे मन बदलण्यासाठी आणि सासू अमला अक्किनेनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये समांथाने बोल्ड भूमिका साकारली होती. त्याचा परिणाम हा नागा चैतन्य आणि तिच्या वैवाहिक जीवनावर पडला आहे. त्यामुळे ते विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Story img Loader