दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते. समांथाच्या सौंदर्यासह लाखो चाहते आहेत. तिने तिच्या सौंदर्याबरोबर अभिनय कौशल्याने एक वेगळी छाप पाडली आहे. तिने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. मात्र नुकतंच समांथाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे समांथाने शूटिंगमधून ब्रेक घेतला असून उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आहे. तिला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे.
समांथा ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिचा आगामी ‘खूशी’ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. मात्र अचानक तिने या शूटींगदरम्यान ब्रेक घेतला आहे. एका गंभीर आजारामुळे समांथाने शूटिंगमधून ब्रेक घेतला असल्याचे सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : “माझ्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभव…”, समांथाने केला खासगी आयुष्याबद्दलचा मोठा खुलासा
अनेक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून समांथा ही त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त आहे. ‘पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन’ असे या आजाराचे नाव आहे. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यामुळे होतो. या आजारामुळे समांथा ही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातही ती कुठेच दिसली नाही.
समांथाला तज्ज्ञ डॉक्टरांनी तिला कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या सल्ल्यानुसार तिने तिच्या कामातून ब्रेक घेतला आहे. तसेच ती या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्याचेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : “मी तुम्हाला…”, समांथाने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिले अनोखे चॅलेंज
समांथा सध्या खुशी या चित्रपटाचे शूटींग करत आहे. तिने या चित्रपटाच्या शूटींगमधून ब्रेक घेतला आहे. यात ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र तिच्या या आजारपणामुळे या शूटिंगचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आले आहे.