दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथाचे लाखो चाहते आहेत. समांथा गेल्या अनेक दिवसांपासून अल्लु अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातल्या तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत आहे. तिचं हे गाणं सुपरहिट झाला. या सगळ्यात समांथाला बॉलिवूडमधून एकत्र ३ चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत. एवढंच काय तर यासाठी तिला चांगलं मानधन देखील मिळणार आहे. खरतरं अजून याची घोषणा करण्यात आली नाही.
समांथाने बॉलिवूडमध्ये अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजमधून पदार्पण केले. यामध्ये समांथाने तिच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधले. आता पुष्पातल्या आयटम सॉंगनंतर समांथाला बॉलिवूड चित्रपटांच्या अनेक ऑफर मिळत असल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्टनुसार, यशराज फिल्म्सकडून समांथाला तीन चित्रपटांची ऑफर मिळाली आहे. यासाठी तिला मोठी रक्कम दिली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. तर समांथाने हे चित्रपट करण्यास होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्या दोघांनी अजून या बातमीला दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, समांथाच्या हातात आणखी बरेच प्रोजेक्ट्स आहेत. यात ‘Kaathu Vaakula Rendu Kaadhal’, ‘शाकुंतलम’, ‘यशोदा’ हे तामिळ चित्रपट आणि ‘अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ या चित्रपटातून समांथा इंटरनेशनल डेब्यू करणार आहे. तर समांथा शेवटी ‘पुष्पा’ चित्रपटात आयटम साँग करताना दिसली होती. त्याच्या ‘ऊ अंतवा’ गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यासाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते.