दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि पती नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सध्या त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत की हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्यात आलेल्या या दुराव्यामुळे चाहते दु: खी आहेत, कारण या बातमीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या दोघांच्या चाहत्यांची फक्त एकच इच्छा आहे की ते दोघे लवकरच एकत्र आले पाहिजेत. मात्र, समांथा पती नागा चैतन्यपासून लांब मुंबईत राहणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आता समांथाने प्रतिक्रिया दिली आहे.

समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक Q&A सेशन ठेवले होते. त्या दरम्यान तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यावेळी एका नेटकऱ्याने तिला प्रश्न विचारला की तू मुंबईत राहायला जाणार आहेस का? त्यावर उत्तर देत समांथा म्हणाली, “मला कळत नाही की या अफवा कशा सुरु होतात? जशा इतर शेकडो अफवा पसरवल्या जात आहेत, तशीच ही सुद्धा एक अफवाच आहे. हैदराबाद माझं घर आहे आणि नेहमीच ते माझं घर राहील. हैदराबादने मला खूप काही दिलं आहे आणि मी अत्यंत आनंदाने इथे राहीन.”

आणखी वाचा : ‘तुम्ही तुमच्या पत्नीवर लक्ष द्या’, जिनिलियावर लक्ष ठेव सांगणाऱ्या ट्रोलरला रितेशचे सडेतोड उत्तर

आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील ‘हे’ सुपरस्टार एकेकाळी होते बेरोजगार…

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडण्याचे कारण समांथाचे चित्रपट आणि करिअरवर असलेले तिचे प्रेम आहे. लग्नानंतरही समांथा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि ग्लॅमरस फोटोशूट करत राहते. पण पती नागा चैतन्य आणि तिचे सासरे नागार्जुन यांना हे आवडत नाही. दोघेही समांथाला तिचे मन बदलण्यासाठी आणि सासू अमला अक्किनेनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader