दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते. समांथाने तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप पाडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या समांथा ही अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत काश्मीरमध्ये ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटींग करताना दिसत आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याचे बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समांथा आणि विजय हे दोघेही सध्या ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. या चित्रपटातील एका स्टंट सीनच्या शूटींगदरम्यान गंभीर अपघात झाला आहे. यात त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Video : …अन् वाढदिवसाच्या दिवशी भर सेटवर समांथाला अश्रू अनावर
विजय देवरकोंडाच्या टीममधील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, समांथा आणि विजय हे काश्मीरमधील पहलगाम भागात एका स्टंट सीनचे शूटींग करत होते. या दोन्ही कलाकारांना लिडर नदी (Lidder river) दोन्ही किनाऱ्यांवर बांधलेल्या दोरीवर एक स्टंट करायचा होता. हा स्टंट सुरु असताना ते दोघेही नदीतील खोल पाण्यात पडले. यावेळी त्या दोघांच्याही पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्या दोघांनाही तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
या अपघातानंतर ते दोघेही रविवारी शूटींगवर परतले. यावेळी त्यांना श्रीनगरच्या दाल सरोवरात शूटिंग करायचं होतं. पण शूटिंगदरम्यान त्या दोघांनाही पाठदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांना तिथे एका फिजीओथेरपिस्टला बोलवण्यात आले. सध्या त्या दोघांची फिजिओथेरपी सुरु आहे.
घटस्फोटानंतर केलेल्या बोल्ड फोटोशूटवर समांथाचा मोठा खुलासा, म्हणाली “एकेकाळी…”
नुकतंच या चित्रपटाचे काश्मीर भागातील शूटींग पूर्ण झाले होते. सध्या ते दोघेही ‘कुशी’ची संपूर्ण टीम परत आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर करत याबबतची माहिती दिली होती.
दरम्यान समांथा आणि विजय यांच्या ‘कुशी’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टायटल ट्रॅक नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक शिव निर्वाण हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. समांथा आणि विजय यांच्याशिवाय मुरली शर्मा, जयराम, सचिन खेडाकर, सरन्या प्रदीप, वेनेला किशोर हे कलाकारही झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स करत आहे. या बहुभाषिक चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक हेशम अब्दुल वहाब करत आहेत. येत्या २३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.