गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर लगेच तिने ‘पुष्पा’ चित्रपटात आयटम सॉंग केले. त्यामुळे चर्चांना उधाण आले. दरम्यान, समांथाने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत वेनेला किशोर आणि राहुल रविंद्र दिसत आहेत. त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तिने ‘मी तुमच्या शिवाय काय करु शकते?’ असे कॅप्शन दिले आहे. समांथाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून चर्चेत आहे.
आणखी वाचा : तू जे करत आहेस हे बरोबर आहे की चुकीचे…; अल्लू अर्जुनने समांथासाठी केलेले वक्तव्य चर्चेत

राहुल रविंद्र एक अभिनेता आहे आणि समांथाची जवळची मैत्रिण चिन्मय प्रसादचा पती आहे. चिन्मयने समांथाच्या अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे. वेनेला किशोर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कॉमेडियन आहे. नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर समांथा तिच्या जवळच्या मित्रमैत्रीणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेब सीरिजचे समांथा चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जाते.