घटस्फोटानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. तसचं पुन्हा एकदा ती तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करू लागली आहे. नुकताच समांथाने तिच्या इन्स्टास्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. समांथाने जिममधील एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने विनोद करत जिम ट्रेनरला टॅग केलंय.
समांथाने इन्स्टास्टोरीला डंबेल घेऊन वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओवर तिने एक धमाल कॅप्शन दिलंय. “तुझा माझ्यावर किती धाक आहे… शारिरिकदृष्ट्या तू इथे नसतानाही मी तुला घाबरते. दुसऱ्या कुणासाठी हे ३० किलोचे डंबेल उचलले नसते. एकदा बघ ते माझ्या अर्ध्या वजनाचे आहेत.”असं मजेशीर कॅप्शन देत समांथाने तिच्या जिम ट्रेनरला यात टॅग केलंय.
“चेकअप करताना अचानक त्याने…”; लहानपणी अनेकदा डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा नीना गुप्तांनी केला खुलासा
समांथाने महिन्याच्या सुरुवातीला नागा चैतन्यासोबत विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नुकतच समांथाला एका पेट क्लिनिकजवळ तिच्या श्वानासोबत स्पॉट करण्यात आलं होतं.
समांथाने शेअर केली होती विभक्त होत असल्याची पोस्ट
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये “आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, बराच विचार केल्यानंतर मी आणि चै(नागा चैतन्य)ने पती-पत्नीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहोत आणि आमच्यात असलेल हे नात कायम राहिलं. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात ते आम्हाला पाठिंबा देतील आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,” अशा आशयाची पोस्ट समांथाने केली होती. समांथाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.