दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून तिला झालेल्या मायोसिटीस आजारामुळे चर्चेत आहे. या आजारातून लवकर बरे होण्यासाठी तिचे चाहतेही प्रार्थना करत आहेत. दरम्यान समांथाच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज समोर आली आहे. समांथा तिचा पूर्वाश्रमीचा पती व दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यासह पुन्हा एकत्र येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा व नागा चैतन्यने एकत्र येण्यासाठी होकार दर्शविला आहे. परंतु, हा होकार एका प्रोजेक्टसाठी असल्याचं कळतंय. समांथा व नागा चैतन्य प्रोजेक्टसाठी एकत्र काम करण्यासाठी तयार आहेत. ‘बॉलिवूड लाइफ’च्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “समांथा-नागा चैतन्यची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते, हे दोघानंही ठाऊक आहे. त्यामुळे वैयक्तिक भांडणे बाजूला ठेवून ते कामासाठी एकत्र येण्यास तयार झाले आहेत. नागा चैतन्य समांथाला एक चांगली मैत्रीण समजतो. तिच्या आजाराबाबत समजताच त्याने केलेल्या विचारपूसमुळे नागा चैतन्याला समांथाची काळजी आहे, हे दिसून आलं आहे”.

हेही वाचा >> झी मराठी वाहिनीवरील सुबोध भावेचा ‘बस बाई बस’ कार्यक्रम बंद, तीन महिन्यांतच घेतला प्रेक्षकांचा निरोप

हेही वाचा >> …अन् रणवीर सिंगने बायकोकडे मागितलं किस, दीपिका पदुकोणच्या पोस्टवरील कमेंट चर्चेत

नागा चैतन्य व समांथाने २०१७ साली लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नागा चैतन्य-समांथाची जोडी लोकप्रिय होती. २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.  नागा चैतन्य-समांथाच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. आता ते ऑन स्क्रीन एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.

दरम्यान, समांथा तिच्या आगामी यशोदा चित्रपटासाठी उत्सुक आहे. ११ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu and naga chaitanya will seen together after divorce kak