दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या अभिनयापासून दूर आहे. तिने चित्रपटांमधून वर्षभरासाठी ब्रेक घेतला आहे. ब्रेक घेतल्यानंतर ती परदेशात फिरत आहे. चित्रपटांपासून दूर असली तरी ती अनेक इव्हेंट्सला हजेरी लावत असते. फोटोशूट करत असते आणि ते फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती, पण चार वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर नागा चैतन्य सोभिता धुलिपालाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. पण समांथा मात्र सिंगल असून ती म्युकर मायकोसिस आजारातून सावरत आहे. अशातच तिला दुसऱ्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. त्यावर तिने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

रविवारी समांथाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि तिने त्याची मजेशीर उत्तरं दिली. त्यातच एका इन्स्टाग्राम यूजरने तिला ‘तू पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहेस का?’ असं विचारलं. याचं उत्तर देत समांथा म्हणाली, “आकडेवारी पाहता ही एक वाईट गुंतवणूक आहे.” त्याला उत्तर देताना समांथाने घटस्फोटाची आकडेवारी शेअर केली.

Video: बिग बी आले, विहीणबाईंना भेटले अन्…; अनफॉलो केल्याच्या चर्चांनंतर अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय समोर आल्यावर काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
samantha ruth prabhu
समांथा रुथ प्रभूची स्टोरी

या आकडेवारीमध्ये पहिल्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण ५० टक्के, दुसऱ्या लग्नात ६७ टक्के आणि तिसऱ्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण ७३ टक्के असल्याचं लिहिलं आहे.