अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा सामंथा मागच्या काही काळापासून सातत्यानं तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तीच ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स तिला, ‘हिंदी बोलता येते का?’ असं विचारताना दिसत आहेत. पण यावर सामंथानं त्यांना जे उत्तर दिलं त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सामंथा एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसत आहे. तिनं करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कही लावला होता. यावेळी ती तिथे असलेल्या फोटोग्राफर्ससोबत खूपच आपुलकीनं वागताना दिसली. एका फोटोग्राफरनं सामंथाला यावेळी तुला हिंदी बोलता येतं का असा प्रश्न विचारला. त्यावर सामंथानं ‘थोडं- थोडं’ असं हिंदीतून उत्तर देत सर्वांची मनं जिंकली. सामंथाचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आणखी वाचा- फरहान अख्तरशी का केलं लग्न? शिबानी दांडेकरनं सांगितलं खरं कारण

सामंथाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे काही दाक्षिणात्य चित्रपट आहे. तसेच ती अलिकडच्या काळात मुंबईत दिसत असल्यानं लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान काही काळापूर्वीच ती ‘पुष्पा’ चित्रपटाच्या आयटम नंबरमध्ये दिसली होती. जे प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu answer to paparazzi question if she knows hindi mrj