दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून ती चित्रपटांसाठी मानधन म्हणून मोठी रक्कम आकारते. समांथाने घरात गुंतवणूक केल्याच्या बातम्या येत आहेत. तिने फेब्रुवारी महिन्यात मुंबईत एक घर खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता हैदराबादमध्ये तिने घर खरेदी केलं आहे. तिच्या या घराची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
२१ वर्षांच्या पतीने १५ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आदळून केलं जखमी; अभिनेत्रीने पोलिसांत दिली तक्रार
‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, या फ्लॅटची किंमत ७.८ कोटी रुपये आहे. सामंथाने लॅविश थ्री बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. फ्लॅटचे वैशिष्ट्य म्हणजे इथून सी व्ह्यू दिसतो. घरासोबत ६ पार्किंग स्लॉट आहेत. हे आलिशान घर जयभेरी ऑरेंज काउंटीमध्ये आहे. घर मॉडर्न असून सर्व सोई-सुविधा असलेलं आहे.
काही महिन्यांपूर्वी तिने मुंबईत १५ कोटींचे अपार्टमेंट खरेदी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. याशिवाय तिचे जुबली हिल्समध्ये १०० कोटींचे आलिशान घर देखील आहे आणि आता अभिनेत्री आणखी एका नवीन घराची मालकीण बनली आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास अखेरची ती ‘शाकुंतलम’ चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ती विजय देवरकोंडाबरोबर ‘कुशी’ चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.