बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. विशेष म्हणजे अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक आणि बॉलिवूडमधील कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने हा चित्रपट कसा वाटला? याबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच समांथाने आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर समांथाने या चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. विशेष म्हणजे तिने या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ म्हटले आहे.

समांथाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत असे म्हटले की, “गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट मास्टरपीस आहे. आलिया भट्ट तुझ्या अभिनयाबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील. तुझे प्रत्येक संवाद आणि हावभाव हे मनावर कोरले गेले आहेत.”

केवळ सामंथाच नाही तर सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील आणि अनुराग कश्यप यांनीही आलियाचे कौतुक केले आहे. ‘राझी’ चित्रपटात आलियासोबत काम केलेल्या विक्की कौशलनेही कौतुक करताना म्हटले की, ‘या चित्रपटातील तुझ्या उत्तम अभिनयाने मी चकित झालो. संजय लीला भन्साळी सर तुम्ही मास्टर आहात आणि आलिया भट्ट तुमच्याबद्दल काय बोलावे हेच मला समजत नाही. तू गंगू म्हणून उत्कृष्ट आहेस.’

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu comment on alia bhatt for her performance in gangubai kathiawadi nrp
Show comments