दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समांथा रुथ प्रभू आहे. तिनं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तसेच ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या तिच्या गाण्यानं अक्षरशः लोकांना वेड लावलं आहे. अशातच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्याच्या कारणास्तत्व समांथानं हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शाकुंतलम’ या चित्रपटानंतर समांथा प्रभू तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. यासाठी वरुण धवनबरोबर ती शूटिंग करत आहे. शिवाय तिचा विजय देवरकोंडबरोबर ‘कुशी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशा व्यग्र वेळापत्रकामुळे समांथाच्या आरोग्याकडे दुर्लेक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी समांथानं एक वर्षांकरिता अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – संजय दत्तचा ‘त्या’ गाण्यावरील डान्स पाहून सरोज खान खुर्चीवरून पडल्या होत्या खाली; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

हेही वाचा – Video : लग्न, किस, हूकअप… कोणाबरोबर काय करशील? आकांक्षा पुरी म्हणाली, “सलमान खानबरोबर…”

एंटरटेनमेंट मीडियाच्या माहितीनुसार, समांथाच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितलं आहे की, “अभिनेत्री आपल्या सर्व चित्रपटांचं शूटिंग संपवले आणि त्यानंतर ती एक वर्षांचा ब्रेक घेणार आहे. यावेळात ती पूर्णपणे आरोग्यावर लक्ष देणार आहे. सध्या ती ‘कुशी’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहे, जे दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल. हा चित्रपट तिचा शेवटचा असेल. तसेच ‘सिटाडेट’ सीरिजचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे समांथाचा लवकरच एक वर्षांचा ब्रेक सुरू होईल. आता ती कोणताही तेलुगू किंवा बॉलीवूड चित्रपट करणार नाही. संपूर्ण वेळ आजारातून पूर्णपणे बरा होण्यासाठी ती देणार आहे. त्यानुसार ती वेळापत्रक तयार करत आहे. तसेच समांथानं ज्या निर्मात्यांकडून आधीच मानधन घेतलं होतं, ते देखील परत केलं आहे.”

हेही वाचा – Video: नाकाची सर्जरी झाल्यानंतर शाहरुख खान भारतात परतला; पत्नी व मुलाबरोबरचा व्हिडीओ आला समोर

समांथा ‘मायोसायटिस’ नावाच्या एका ऑटोइम्यून आजारानं ग्रस्त आहे. याबाबतची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावरील पोस्टद्वारे करून दिली होती. सध्या याच आजाराबरोबर तिची झुंज सुरू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu decided to take one year break from films for health treatment pps