दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला मायोसायटिस या गंभीर आजाराचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रुग्णालयातील फोटो शेअर करत याबाबत तिच्या चाहत्यांना माहिती दिली. समांथाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही तिच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे.

समांथाने तिच्या पोस्टमध्ये “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हा आजार लवकरच बरा होईल आणि मी लवकर ठीक होईन, मला जास्त त्रासही होणार नाही. पण आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू जाणवतंय की, नेहमीच मी मजबूत आहे खंबीर आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की मी लवकरच ठीक होईन”, असं म्हटलं होतं.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

हेही वाचा >> “माणूस निघून गेला की समजतं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, शेअर केली भावुक पोस्ट

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

समांथाच्या या पोस्टवर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अखिल अक्कीनेनी यानेही कमेंट केली आहे. “तुला खूप सारं प्रेम आणि बळ, प्रिय सॅम”, असं त्याने कमेंट करत म्हटलं आहे. अखिल अक्कीनेनी हा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा मुलगा आणि समांथाचा पूर्वाश्रमीचा पती नागाचैतन्यचा भाऊ आहे. त्याच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

samantha ruth prabhu
समांथाच्या या पोस्टवर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अखिल अक्कीनेनी यानेह कमेंट केली आहे.

आणखी वाचा >> Video: प्रमोशनदरम्यान कतरिना कैफ ‘हाऊ इज द जोश’ म्हणाली अन्…; व्हायरल व्हिडीओ पाहा

समांथा आणि नागाचैतन्य चार वर्षांच्या सुखी संसारानेतर २०२१मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. घटस्फोट घेतल्यानंतरही ते अनेक दिवस चर्चेत होते.

Story img Loader