समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘यशोदा’, ‘थेरी’, ‘माजिली’, ‘अ आ’, ‘अंजान’, ‘यु टर्न’, ‘पुष्पा’ अशा सुपरहिट चित्रपटांतून समांथाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या समांथाचा चाहता वर्गही मोठा आहे.

समांथाच्या अशाच एका जबरा फॅनने तिचं मंदिर बांधलं आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बापटला अलापडू गावात चाहत्याकडून समांथाचं मंदिर बांधण्यात येत आहे. या मंदिराचं बांधकाम सध्या सुरू असून समांथाच्या वाढदिवशी म्हणजेच २८ एप्रिलला याचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. समांथाच्या या जबरा फॅनच नाव संदिप तेनाली असं आहे.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Tourists can now taste sweet honey along with tiger sighting at Tipeshwar Sanctuary
टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जिवापाड प्रेम करायची मनीषा कोईराला, अभिनेत्याला दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

समांथा व तिच्या या चाहत्याची अद्याप भेट झालेली नाही. समांथाच्या प्रत्युष्या फांऊडेशनच्या कामामुळे प्रभावित होऊन तिचं मंदिर बांधत असल्याचं संदिप तेनाली यांनी सांगितलं. समांथाच्या आधी अनेक दाक्षिणात्य व बॉलिवूड सेलिब्रिटींची मंदिरे त्यांच्या चाहत्यांनी देशातील विविध भागात बांधली आहेत. हंसिका मोटवानी, नयनतारा, अमिताभ बच्चन, सोनू सूद या कलाकारांच्या प्रेमापोटी चाहत्यांकडून त्यांची मंदिरे बांधण्यात आली आहेत.

हेही वाचा>> ‘रामायणा’तील सीतेसाठी दीपिका चिखलिया यांनी नाकारलेला हॉलिवूड चित्रपट; मैत्रिणीने केलेला खुलासा, म्हणालेली “तिला अंगप्रदर्शन…”

दरम्यान, समांथा रुथ प्रभू ‘शंकुतलम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. समांथा तिच्या आगामी ‘खुशी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाता ती विजय देवरकोंडाबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

Story img Loader