दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता नागाचैतन्य हा कायमच चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी समांथा आणि नागाचैतन्य यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता दोन वर्ष उलटली आहेत. या दरम्यान नागाचैतन्य हा हॉटेलमध्ये राहत होतो. मात्र आता त्याने स्वत:चे नवीन घर खरेदी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागाचैतन्यने खरेदी केलेले हे नवीन घर हैदराबादमध्ये आहे. नागाचैतन्यचे हे नवीन घर अतिशय आलिशान आहे. त्याची रचनाही फार सुंदर आहे. त्याच्या घराचे संपूर्ण डिझाईन त्याच्या आवडीचे बनवलं आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या कुटुंबाच्या घराजवळच नवीन घर घेतले आहे.
आणखी वाचा : समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

‘द सियायत डेली (The Siasat Daily)’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून नागाचैतन्यच्या या घराचे काम सुरु होते. त्यामुळे तो जवळच्याच एका ५ स्टार हॉटेलमध्ये राहत होता. आता त्याच्या घराचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो नवीन घरात राहण्यास गेला आहे.

आणखी वाचा : “काहीवेळा एक छोटीशी ठिणगीही…”, नागाचैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलेल्या समांथाची पोस्ट चर्चेत

दरम्यान नागाचैतन्यच्या या घराची किंमत १५ कोटी रुपये इतकी असल्याचे बोललं जात आहे. नागाचैतन्य हा लवकरच ‘कस्टडी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कृती शेट्टी, अरविंद स्वामी, प्रियामणी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu ex husband naga chaitanya moves into new house in hyderabad know price nrp