प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्याआधी काही दिवसांपूर्वीच समांथाने तिच्या आजारपणाविषयीची माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर समांथाने चाहते चिंतेत असून ती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. अशात आता समांथाने नुकतीच केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.

समांथाला मायोसिटिस नावाचा गंभीर आजार झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. त्यानंतर आता समांथाने पहिल्यांदाच स्वतःचा फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनची माहिती देतानाच सध्याच्या कठीण काळात ती कशाप्रकारे स्वतःला खंबीर ठेवत आहे हेही सांगितलं आहे.

आणखी वाचा- घटस्फोटानंतरही नागा चैतन्यला समांथाची काळजी, आजारपणाविषयी समजताच केलं असं काही

समांथाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिलं, “माझ्या एका जवळच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे दिवस कितीही वाईट असेल किंवा कितीही वाईट गोष्टी आयुष्यात घडत असल्या तरीही त्याचं ब्रीद असतं की, शॉवर, शेव्ह आणि शो अप. त्याचं हेच वाक्य आता मी एक दिवस ‘यशोदा’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी उधार घेत आहे. ११ तारीखला भेटूयात.” समांथाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली असून तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर आजारपणाचा ताण, थकवा स्पष्ट दिसत आहे.

आणखी वाचा- आजाराबद्दल कळताच चिरंजीवींनी समांथाला पाठवला खास निरोप; म्हणाले, “परिस्थितीशी झुंजणारी…”

दरम्यान समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, “काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार असल्याचे निदान झाले. मला वाटले की मी बरे झाल्यानंतर याबद्दल सांगेन, पण याक्षणी त्यातून बरं होण्यासाठी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होईन, असा विश्वास डॉक्टरांना आहे.”