गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर आता ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे ती प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच समांथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
समांथाने नुकतंच कॉफी विथ करणच्या ७ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळीचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी अभिनेता करण जोहरने तिला नागाचैतन्यसोबत घटस्फोट घेण्यावरुन एक प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, “माझ्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभवांचे सर्वात मोठे कारण तुम्हीच आहात. लग्न हे ‘कभी खुशी कभी गम’ सारखे असते हे तुम्ही चित्रपटांमध्ये दाखवले आहे. मात्र ते खऱ्या आयुष्यात KGF सारखे आहे आणि त्यामुळे सगळेच नाराज आहेत.”
घटस्फोटानंतर केलेल्या बोल्ड फोटोशूटवर समांथाचा मोठा खुलासा, म्हणाली “एकेकाळी…”
दरम्यान समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँगमुळे ती चर्चेत आली.
घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…
समांथा लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नागाचैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागाचैतन्य हा आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.