समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल होते. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. नागाचैतन्य व समांथाने २०१७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या चारच वर्षात त्यांचा सुखाचा संसार मोडला. २०२१मध्ये घटस्फोट घेत नागाचैतन्य व समांथा वेगळे झाले. पण तसं जरी असलं तरी पूर्वाश्रमिच्या नवऱ्याच्या नावाचा टॅटू समांथाने अजूनही तसाच ठेवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुण धवन आणि समांथा रूप प्रभू यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिटाडेल’ या सिरीजचा नुकताच लंडनमध्ये मोठ्या दिमाखात प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. या प्रीमियरदरम्यानचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच काही फोटोंमध्ये समांथा रूथ प्रभुने नागाचैतन्यच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या नावाचा टॅटू काढला होता तो स्पष्ट दिसत आहे.

आणखी वाचा : समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

सामंथा रुथ प्रभूने पूर्वाश्रमिचा पती नागाचैतन्यसाठी पोटाच्या उजव्या बाजूला ‘चाय’ नाव गोंदवलं होतं. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले यात हा टॅटू दिसत आहे. आता या टॅटूची खूप चर्चा रंगली आहे. याचबरोबर तिने काही वर्षांपूर्वी आणखीन एक टॅटू काढला होता जो नागा चैतन्यसोबतच्या तिच्या पहिल्या चित्रपटाशी ‘ये माया चेसावे’शी संबंधित आहे. तर आता तिच्या या नागाचैतन्याच्या नावाच्या टॅटूचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : “मी कधीही…”; नागाचैतन्यच्या डेटिंगबद्दल दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेबाबत समांथा रुथ प्रभूचा मोठा खुलासा

दरम्यान, सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या कामामुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘शकुंतलम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर यानंतर आता ती लवकरच वरुण धवनबरोबर ‘सिटाडेल’ या सिरीजमध्ये प्रमुख भूमिका करताना दिसेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu have not removed a tattoo which has connection with naga chaitanya rnv