अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट जबरदस्त हिट ठरला; तर समंथा रुथ प्रभूच्या ‘उ अंटवा’ गाण्यानं प्रेक्षकांना भुरळ घातली. या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि समंथाच्या जोडीचंही विशेष कौतुक झालं. अशातच आता साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि समांथा आगामी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटली या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

पिंकविलाच्या माहितीनुसार, ॲटली पहिल्यांदाच अल्लू अर्जुनबरोबर काम करणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. ॲटलीने या चित्रपटासाठी कास्टिंग प्रोसेसही सुरू केली आहे. प्रॉडक्शनच्या सुत्रांनुसार, नायिकेच्या भूमिकेसाठी ॲटलीची समांथाबरोबर बोलणी सुरू आहेत.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स

२०१५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सत्यमूर्ती’नंतर अल्लू अर्जुन आणि समांथा पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याची शक्यता टाळता येणार नाही.

हेही वाचा… ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’च्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरऐवजी ‘या’ व्यक्तीकडे, चित्रपट नसून असणार वेब सीरिज

पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, “समांथा आणि अ‍ॅटली यांनी यापूर्वी ‘थेरी’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे आणि आता अल्लू अर्जुन अभिनीत चित्रपटात दोघं पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्या वेळेस समांथा आणि अ‍ॅटलीचा बॉण्ड खूप चांगला होता आणि आता पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्यानं दोघंही उत्सुक आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत हा सिनेमा धमाका घेऊन येणार आहे.”

हेही वाचा… “कितीही बोटॉक्स केलं तरी…” फिलर्स आणि सर्जरीबद्दल करण जोहर स्पष्टच म्हणाला…

दरम्यान, मोठं बजेट असलेल्या अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटलीच्या या अ‍ॅक्शन चित्रपटाचं प्रॉडक्शन ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू होईल. तर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ लवकरच सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समांथा वरुण धवनबरोबरच्या ‘सिटाडेल : हनी बनी’ सीरिजच्या तयारीत दिसते आहे.

Story img Loader