दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून समांथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. नुकताच ती पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉन्गमुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकताच समांथाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. सध्या समांथा तिच्या काही मित्रांसोबत गोव्यात ख्रिसमस साजरा करत आहे. तिथले तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये समांथाने निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. ती पाण्यात बसली असून सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…

आणखी वाचा : अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने दोनदा केला होता साखरपुडा!

दरम्यान, तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले. रिपोर्टनुसार, समांथाला नागा चैतन्यच्या कुटुंबाकडून २०० कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार होते. पण तिने त्यांच्याकडून १ रुपया ही घेण्यास नकार दिलाय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu in blue monokini sets the internet on fire shares sizzling photos from goa vacation dcp