दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. या सर्व चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त प्रमाणात सुरु झाल्या. पती नागाचैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे ती चर्चेत होती. आता मात्र समांथा एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. नागाचैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर आता समांथाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
समांथा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. विशेष म्हणजे पती नागाचैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतरही ती सोशल मीडियावर फार सक्रीय झाली. विविध चित्रपट किंवा आगामी प्रोजेक्टबद्दल ती कायम पोस्ट करताना दिसते. त्यासोबतच ती तिच्या फिटनेसचे अनेक व्हिडीओदेखील शेअर करताना दिसते. नुकतंच समांथाने तिच्या पुढील आयुष्याबद्दल एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा : समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन
गेल्या काही दिवसांपासून समांथाने सोशल मीडियाला रामराम केला आहे. तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमातही ती झळकलेली नाही. मात्र अनेक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समांथा ही सध्या दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे. ती तिचा भूतकाळ विसरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या कठीण काळातून तिला बाहेर काढण्यासाठी अनेक मित्र मदत करत आहेत.
आणखी वाचा : घटस्फोटाच्या ६ महिन्यानंतर समांथाने शेअर केला नागाचैतन्यसोबतचा खास फोटो, म्हणाली…
समांथाचे गुरु सद्गुरु जगदीश वासुदेव यांनी तिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला आहे, असे म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे गुरुंनी दिलेल्या प्रत्येक सल्ल्याचे समांथा पालन करते. त्यामुळे तिने त्यांचा हा सल्लाही मान्य केला आहे. सध्या तिचे गुरु तिला तिचा भूतकाळ विसरण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. त्यामुळे आता समांथाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान समांथाने सोशल मीडियावरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकल्यानंतर ते दोघंही वेगळे होणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी समांथा आणि नागाचैतन्य यांनी एक स्टेटमेंट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली होती.