दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते. समांथाच्या सौंदर्यासह लाखो चाहते आहेत. तिने तिच्या सौंदर्याबरोबर अभिनय कौशल्याने एक वेगळी छाप पाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून समांथा एका गंभीर आजाराशी झुंजत आहे. समांथाला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. नुकतंच तिने तिच्या या आजाराबद्दल आणि त्याच्या उपचाराबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथा ही गेल्या काही दिवसांपासून मायोसायटिस या आजाराशी सामना करत आहे. या आजारात मांसपेशींना बरीच सूज येते. यामुळे प्रचंड वेदना होतात. त्याशिवाय या आजारात शरीरातील स्नायूदेखील कमकुवत होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समांथाने या आजारपणात तिला झालेल्या वेदनांबद्दल सांगितले आहे. तसेच याकाळात तिला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, याबद्दलही भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “मी संपलेली नाही…” आजारपणासह सोशल मीडिया एक्झिटबद्दल समांथा स्पष्टच बोलली

“मला मायोसायटिस हा आजार झालाय हे कळाल्यानंतर फार मोठा धक्का बसला होता. या आजाराचे खूप दुष्परिणाम आहेत. अनेकदा माझ्या शरीरावर सूज यायची . काही वेळा तर मी अचानक लठ्ठ व्हायचे. तर कधी अचानक खूप आजारी पडायचे. माझे माझ्या या आजारावर अजिबात नियंत्रण नव्हते”, असे समांथा म्हणाली.

“एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री यांचे डोळे हे बोलके आणि भाव व्यक्त करण्यासाठी असतात. पण मी जेव्हा सकाळी उठायचे, तेव्हा माझे डोळे सुजलेले असायचे. त्यात अनेक सुया टोचलेल्या असायच्या. मी फक्त फॅशनसाठी चष्मा घालत नाही. मला जास्त प्रकाशाचा त्रास होतो. मला मायग्रेनचा त्रास होतो. पण मी त्यावेळी चष्माही घालू शकत नव्हते. माझ्या डोळ्यात मोठ्या प्रमाणावर वेदना व्हायच्या. तब्बल ८ महिने हे सर्व असंच सुरु होते. हे सर्व माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. कोणत्याही अभिनेत्यासाठी आजारपण ही सर्वात वाईट गोष्ट असते. या आजाराचा माझ्या संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम झाला”, असे समांथाने म्हटले.

आणखी वाचा : समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

“जेव्हा तुम्ही कलाकार असता, तेव्हा तुम्ही कायम तंदुरुस्त असणं अपेक्षित असते. तुमच्या चित्रपटात परफेक्शन असायचा हवं. तुमच्या सोशल मीडियावरही ते परफेक्शन दिसायला हवं. तुम्ही जे काही कराल त्यात एक परिपूर्णता असावी लागते. मी सुरुवातीला या गोष्टी स्वीकारल्या. मला नेहमीच चांगले करायचे होते. आता मात्र मी या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवते”, असे समांथाने सांगितले.

दरम्यान समांथाने गेल्या वर्षी तिच्या आजाराची माहिती मिळाली. तिला मायोसिटिस नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. यासाठी समांथाने सिनेसृष्टीतून ब्रेकही घेतला होता. ती लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सामंथाने मेनका आणि विश्वामित्र यांची मुलगी शकुंतलाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu myositis diagnosis wake up with pins and needles in eyes share worst experience nrp