अभिनेत्री समांथा रुथ प्रभू विशेष चर्चेत आली ते तिने अभिनेता नागा चैतन्यबरोबर घेतलेल्या घटास्फोटामुळे. समांथा व नागा चैतन्य यांनी ६ ऑक्टोबर २०१७ साली लग्न केलं पण लग्नाच्या काही वर्षांनंतर या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि २०२१ साली त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली.
सोशल मीडियावरही या दोघांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसली. एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर दोघे एकमेकांबद्दल फारसं बोलताना दिसले नाहीत. अशातच आता समांथानं नुकत्याच केलेल्या वक्त्व्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. समांथानं २०१० साली अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. या क्षेत्रात येऊन तिला १५ वर्षं पूर्ण झाली आहेत. या क्षेत्रात इतकी वर्षं काम केल्यानंतर समांथानं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. समांथानं ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यामध्ये ती तिचा पूर्वाश्रमीचा पती व अभिनेता नागा चैतन्य याच्यासह मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाबद्दल बोलताना समांथा म्हणाली “आता जेव्हा मी माझे सुरुवातीचे चित्रपट बघते तेव्हा मला वाटतं की, मी इतकं वाईट काम का केलं होतं?”.
‘ये माया चेसावे’ या चित्रपटात समांथा नागा चैतन्यसह मुख्य भूमिकेत झळकली होती. त्याव्यतिरिक्त समांथा व नागा चैतन्य यांनी ‘जोश’, ‘मजिली’, ‘मनाम’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, या जोडीला तेव्हा विशेष प्रेम मिळालं होतं.
दरम्यान, समांथा अभिनयासह लवकरच नर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. ‘शुभम’ हा समांथाची निर्मिती असलेला पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर समांथा गेल्या काही काळात ‘खूशी’, ‘शकुंतलम’, ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसली आणि लवकरच ती ‘सिटाडेल : हनी बनी’, ‘रक्त ब्रह्मांड : द ब्लडी किंग्डम’ यांसारख्या हिंदी चित्रपटातून बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांसह महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहे.