Samantha Ruth Prabhu on Hema Committee Report: मल्याळम सिनेसृष्टीत (Malayalam Industry) महिला कलाकारांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालातून खुलासा झाला. २३५ पानांच्या या अहवालात अनेक अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक घटनांचं कथन केलं. हा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अभिनेते व आमदार मुकेश यांच्यासह अनेकांवर महिला कलाकारांनी आरोप केले आहेत. त्यानंतर तमिळ व तेलुगू अभिनेत्रीही याबाबत बोलू लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. “आम्ही तेलुगू चित्रपटसृष्टीतील महिला हेमा कमिटीच्या अहवालाचे स्वागत करतो आणि केरळमधील डब्ल्यूसीसीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करतो. डब्ल्यूसीसीच्या धर्तीवर २०१९ मध्ये टीएफआयमधील (तेलुगू फिल्म इंडस्ट्री) महिलांसाठी द व्हॉइस ऑफ वूमेन नावाचा एक सपोर्ट ग्रुप तयार करण्यात आला. याच्या माध्यमातून आम्ही तेलंगणा सरकारला विनंती करतो की, लैंगिक छळावर सादर केलेला उपसमितीचा अहवाल प्रकाशित करावा, जो सरकारला इंडस्ट्रीतील धोरणं आणि टीएफआयमध्ये महिलांसाठी कामाचे सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी मदत करू शकेल,” असं समांथा रुथ प्रभूने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

समांथा रुथ प्रभूची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो स्क्रीनशॉट)

“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

डब्ल्यूसीसी काय आहे?

जस्टिस हेमा कमिटी अस्तित्वात आणण्याचे श्रेय वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) या मल्याळम सिनेमातील महिला कलाकारांच्या संघटनेला जाते. त्यांच्या मागणीनंतर केरळ सरकारने २०१७ मध्ये ही समिती स्थापन केली होती. एका सहकारी अभिनेत्रीला न्याय मिळवून देण्यासाठी इंडस्ट्रीतील महिला एकत्र आल्या होत्या. त्यातून या समितीची स्थापना झाली आणि आता २३५ पानांच्या रिपोर्टमधून इंडस्ट्रीतील धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत.

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

मल्याळम अभिनेत्रीवर अत्याचार अन् अभिनेत्यावर आरोप

‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीवर चार जणांनी कारमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणात आघाडीचा अभिनेता दिलीप सहभागी असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर दिलीपला अटक झाली, पण त्याची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणात तो अद्याप जामिनावर आहे. दिलीपला जामीन मिळताच मल्याळम आर्टिस्ट असोसिएशनने (AMMA) त्याला संघटनेत सामील करून घेतलं होतं. त्यानंतर अम्माच्या अनेक महिला सदस्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. अनेक मल्याळम कलाकार, चित्रपट निर्माते, अभिनेत्री रेवती, अंजली मेनन, रीमा कालीगल, पार्वती थिरुवोथू, मंजू वॉरियर यांनी एकत्र येऊन या अभिनेत्रीला न्याय मिळवून देण्यासाठी विमेन इन सिनेमा कलेक्टिव्हची सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu reacts on hema committee report asks telangana govt to establish safe workplace for women hrc