दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हे गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील ‘ऊ अंतवा’ या आयटम सॉंगमुळे चर्चेत आहे. समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ‘ऊ अंतवा’ या आयटम सॉंगवरील एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत समांथाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कॉमेडियन अभिषेक कुमार आणि निर्मल पिल्लईने शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला निर्मल अभिषेकला सांगताना दिसतो की ते ऊ अंतावा गाणं गुणगुणं थांबव पण नंतर अभिषेक स्वत: हे गाणं गुणगुणताना दिसतो. व्हिडीओमध्ये एक वाक्य त्यांनी ‘जेव्हा रिल्स मधील गाणी तुम्हाला आवडत नाहीत आणि नंतर तीच गाणी तुमच्या डोक्यात बसतात’, असे वाक्य लिहिले आहे. हा कॉमेडी व्हिडीओ शेअर करत ‘मला ऊ अंतावा गाणं डोक्यातून काढून टाकण्यासाठी मदत हवी आहे,’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. तर हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत समांथाने ‘ROLF’ असे कॅप्शन दिले होते.
आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आणखी वाचा : ‘भाबीजी…’ मालिका सोडण्याचे नेहा पेंडसेचे कारण आले समोर
दरम्यान, समांथाच्या हातात आणखी बरेच प्रोजेक्ट्स आहेत. यात ‘Kaathu Vaakula Rendu Kaadhal’, ‘शाकुंतलम’, ‘यशोदा’ हे तामिळ चित्रपट आणि ‘अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ या चित्रपटातून समांथा इंटरनेशनल डेब्यू करणार आहे. तर समांथा शेवटी ‘पुष्पा’ चित्रपटात आयटम साँग करताना दिसली होती. त्याच्या ‘ऊ अंतवा’ गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यासाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते.