समांथा रुथ प्रभू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. समाथांने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पुष्पा चित्रपटातील ‘ऊ उंटावा’ या आयटम साँगमधून समांथाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ मध्येही समांथा दिसणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता समांथाने ‘पुष्पा २’ ची ऑफर नाकारल्याची चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समांथाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ मध्ये काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. याबाबत आता समांथाच्या टीमकडून भाष्य करण्यात आलं आहे. ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा २ चे दिग्दर्शक सुकुमार यांच्याकडून समांथाला चित्रपटात आयटम साँगसाठी विचारण्यात आलं होतं. परंतु, समांथाने आयटम साँग करण्यास नकार दिला आहे. समांथाने आयटम साँग करण्यासाठी तयार नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट, म्हणाले “फहाद अहमद…”

हेही वाचा>> “आदिल मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो, पण…”, तिहेरी तलाकचा उल्लेख करत राखी सावंत म्हणाली “मोदीजी…”

‘पुष्पा २’च्या दिग्दर्शकाने चित्रपटात समांथासाठी छोटी भूमिका तयार करण्याबाबतही तिला विचारलं. परंतु, समांथाने चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे पुष्पा २मध्ये समांथा दिसणार नसल्याने चाहते नाखूश आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटातील आयटम साँगला चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. या गाण्यात समांथा अल्लू अर्जुनसह डान्स करताना दिसली होती.

हेही वाचा>>रिसेप्शन सोहळ्यातील कियारा अडवाणीचा नेकलेस आहे खूपच खास; हिरव्या रंगाच्या एका खड्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

समांथा सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या वेब सीरिजमध्ये समांथा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समांथाच्या शकुंतलम मधील लूकनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.