संमथा रुथ प्रभू ही सध्याची दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील टॉपची अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे खूप चर्चेत आहे. तिने तमिळ आणि तेलुगू भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. संमथाने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटामधील ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर धमाल डान्स केला होता. संमथा सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या कामांमध्ये गुंतलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल २०२२ मध्ये तिने विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्यासह एका चित्रपटामध्ये काम केले. याच वर्षात तिचे आणखी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. संमथाने नुकताच तिच्या ‘शांकुतलम’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले. काही महिन्यापूर्वी या चित्रपटातला तिचा लूक समोर आला होता. या चित्रपटामध्ये संमथा ‘शंकुतला’ हे मुख्य पात्र साकारणार आहे. तिच्या जोडीला अभिनेता देव मोहन असणार आहे. तो ‘राजा दुष्यंत’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुनची लेक अल्लू अरहा मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे.

महान कवी कालिदास यांच्या ‘शंकुतला’ या नाटकावर आधारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन गुणशेखर यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला, सचिन खेडेकर असे कलाकार सहायक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करताना संमथाने “४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘शांकुतलम’ या प्रेमकथेचे साक्षीदार व्हा”, असे कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे. या मोशन पोस्टरमध्ये ती देव मोहनसह पांढरे वस्त्र परिधान करुन उभी आहे. या पोस्टरवरुन हा चित्रपट भव्य-दिव्य असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पौराणिक चित्रपटाची निर्मिती निलिमा गुणा यांनी केली आहे.

आणखी वाचा – ऑस्करच्या शर्यतीत ‘RRR’ मागे पडल्याने हॉलिवूडचे दिग्दर्शक संतापले, म्हणाले, “ही शुद्ध…”

या वर्षात संमथाचे ‘शांकुतलम’ व्यतिरिक्त ‘यशोदा’ आणि ‘खुशी’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu released the motion poster of the upcoming film shankutalam and announced the release date of the film yps