गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे रंगल्या होत्या. समांथाने सोशल मीडिया पोस्टद्वारे पती नागा चैतन्यला घटस्फोट दिल्याचे सांगितल्यामुळे सुरु झाल्या होत्या. तिच्या या निर्णयामुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. पण समांथा देखील शांत बसत नाही. ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते.
नुकताच एका यूजरने ट्विटरवर समांथाला टॅग करत एक ट्वीट केले. ‘घटस्फोटीत समंथाने एका चांगल्या व्यक्तीकडून करमुक्त ५० कोटी रुपये उकळले आहेत’ या आशयाचे ट्वीट करत एका यूजरने तिला ट्रोल केले होते. त्यावर समांथाने उत्तर देत ‘देव तुमच्या आत्म्याला शांती देवो’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : आईशी खोटं बोलून लोकल ट्रेनने प्रवास करत सारा पोहोचली होती एल्फिन्स्टनला अन्…
२ ऑक्टोबर रोजी समांथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. जवळपास चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समांथावर अफेअर्स आणि गर्भपातासारखे गंभीर आरोप करण्यात आले. पण त्यांच्या घटस्फोटाचा खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
नुकताच समांथाने ‘पुष्पा’ या चित्रपटात आयटम साँग केले आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. पण या चित्रपटातील समांथाचे आयटम साँग पाहून सर्वजण चकीत झाले आहेत. एकीकडे तिची प्रशंसा होत आहे तर दुसरीकडे तिला ट्रोल केले जात आहे.