दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी तिच्या आजारपणामुळे पाहायला मिळाल्या. यानंतर तिने सोशल मीडियावरुनही एक्झिट घेतली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. यात तिने तिच्याबद्दलच्या सर्व चर्चांवरही भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने तिचा पती नागाचैतन्यबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर ती सोशल मीडियावर सक्रीय झाली. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तसेच आगामी चित्रपट किंवा प्रोजेक्टबद्दल ती कायम पोस्ट करताना दिसते. अनेकदा ती तिच्या चाहत्यांसाठी फिटनेसचे अनेक व्हिडीओदेखील शेअर करताना दिसते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून समांथा ही सोशल मीडियापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात तिने फक्त तिच्या विविध चित्रपटांबद्दलच्या पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. मात्र नुकतंच समांथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

यात तिने तिच्या पाळीव श्वानाचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा पाळीव श्वान हा लिव्हिंग रुममधील सोफ्यावर मजा-मस्ती करताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना तिने तिच्याबद्दल सिनेसृष्टीत सुरु असलेल्या चर्चांबद्दल एका वाक्यात भाष्य केले. “मी आजारी आहे, पण संपलेली नाही”, असा टोला तिने नेटकऱ्यांना लगावला आहे.

आणखी वाचा : “माझ्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभव…”, समांथाने केला खासगी आयुष्याबद्दलचा मोठा खुलासा

तिच्या या पोस्टवर अनेक नेटकरी लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहे. अभिनेता वरुण धवन, राज अँड डीके, नंदिनी रेड्डी या कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या सोशल मीडियावर परतण्यावरुन आनंद व्यक्त केला आहे. समांथा सध्या खुशी या चित्रपटाचे शूटींग करत आहे. यात ती विजय देवरकोंडाबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्याबरोबरच ती यशोदा आणि शाकुंतलम चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu returns to social media share cryptic post nrp