Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू नुकतीच प्राइम व्हिडीओजच्या ‘सिटाडेल:हनी बनी’ सीरिजमध्ये झळकली. या सीरिजमुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. समांथा रुपेरी पडद्यावर तिला दिलेलं प्रत्येक पात्र अगदी चोख बजावते. त्यामुळेच तिचा चाहता वर्ग फार वाढला आहे. दर्जेदार अभिनयासाठी तिचं नेहमीच कौतुक केलं जातं. अभिनयासह समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळेसुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समांथाने २०१७ मध्ये दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यबरोबर लग्न केलं. काही वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर दोघांच्या नात्यातील दरी अचानक वाढत गेली आणि २०२१ मध्ये त्यांनी या नात्याचा शेवट केला. घटस्फोट घेऊन दोघेही पती-पत्नीच्या नात्यातून मुक्त झाले. घटस्फोटाच्या काळात समांथा फार जास्त नाराज असल्याच्या चर्चा होत्या. नागा चैतन्य सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. ४ डिसेंबरला तो शोभिता धुलिपालाबरोबर विवाह करणार आहे. अशात आता समांथाने नागा चैतन्यला त्याच्या लग्नावरून टोला लगावला आहे.

हेही वाचा : Video: “तुम्ही बेअक्कल लोक आहात…”, मुंबईच्या ट्रॅफिकमधील ‘ती’ कृती पाहून गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली…

समांथाने नुकतीच ‘सिटाडेल:हनी बनी’मधील सहकलाकार वरुण धवनबरोबर प्राइम व्हिडीओच्या मुलाखतीमध्ये हजेरी लावली होती. येथे तिने एक्सला गिफ्ट घेताना वेड्यासारखे पैसे खर्च केल्याचं सांगितलं आहे. तिच्या मुलाखतीचा व्हिडीओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या मुलाखतीमध्ये वरुण धवनने समांथाला विचारले, “तू आतापर्यंत कोणत्या चुकीच्या गोष्टीवर सर्वाधिक आणि अगदी वेड्यासारखे पैसे खर्च केले आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना समांथाने पटकन “माझ्या एक्सचे गिफ्ट्स”, असे उत्तर दिले. वरुणने यावर लगेच किती आणि कोणते? असाही प्रश्न विचारला. तसेच त्याने नाव जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र समांथाने हसत हसत त्याला पुढचे प्रश्न विचारण्यास सांगितलं.

समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले होते. मात्र त्याआधी काही वर्षे या दोघांनी एकमेकांना डेट केले. दाक्षिणात्या सिनेविश्वातील ही जोडी अनेकांची फेव्हरेट होती. त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर यामागचे कारण सांगितले नव्हते. दोघेही वेगळे झाले तेव्हा त्यांचे चाहतेही फार नाराज होते.

हेही वाचा : Video: “तू मराठी आहेस का?”, चाहत्याच्या प्रश्नावर मृणाल ठाकूरने ‘हे’ गाणं गाऊन दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

u

दरम्यान, अभिनेत्री समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने २०१० मध्ये सिनेविश्वात पदार्पण केले. ‘विनयतांडी वरुवाया’ हा समांथाचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर ती ‘ये माया चेसावे’ अशा अनेक चित्रपटांनी तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली.