दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या वर्षी अभिनेता नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर ते दोघे पुन्हा एकत्र येतील या आशेवर चाहते आहेत. पण समांथाने यावर सरळ नकार दिला आहे. आता समांथाचे आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने नुकताच तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘Ask Me Anything’ द्वारे संवाद साधला. यावेळी एका नेटकऱ्याने समांथाला “तू नवीन टॅटू काढण्याचा विचार करत आहेस का?” यावर उत्तर देताना समांथा म्हणाली, “माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की कधीही टॅटू काढू नका. कधीच नाही. कधीही कोणताही टॅटू काढू नका.”

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्न बंधनात?

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

समांथाने नागा चैतन्यसाठी ३ टॅटू बनवले होते. पाठीवर पहिला टॅटू काढला ज्यामध्ये ‘वायएमसी’ ‘YMC’ असे लिहिले होते. हा टॅटू सामंथा आणि नागा चैतन्यच्या ‘ये माया चेसवे’ या पहिल्या चित्रपटाच्या नावावरून काढण्यात आला होता. याशिवाय त्यांनी कमरेच्या वर एक टॅटू आहे ज्यामध्ये नागा चैतन्यचे टोपणनाव ‘चाय’ लिहिलेले आहे. याशिवाय समांथाने तिच्या मनगटावर एक टॅटू काढला आहे आणि तोच टॅटू नागा चैतन्यच्या हातावरही आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

समंथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले. समंथा सगळ्यात शेवटी अभिनेता अल्लु अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ओ अंतवा’ या आयटम साँगमध्ये दिसली होती. आता चाहते समांथाच्या हिंदी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. समंथा सुपरहिट वेब सीरिज ‘फॅमिली मॅन २’ मध्ये मनोज बाजपेयीसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu says never ever get a tattoo after having three tattoos of ex husband naga chaitanya dcp