समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य सध्या त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. २०१७ मध्ये ती दोघं लग्नाच्या बेडीत अडकली. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पण त्यांचं नातं फार टिकलं नाही आणि २०२१ मध्ये नागाचैतन्य व समांथाने घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. आता नागाचैतन्य प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत.
Gulte या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान समांथाला विचारण्यात आले की तिच्या आयुष्यात असे काही आहे का जे तिला विसरायचे आहे. यावर अभिनेत्रीने प्रथम प्रश्न विचारला की हा प्रश्न त्यांच्या नात्याविषयी आहे का? यानंतर ती असंही म्हणाली की, या प्रश्नाचे उत्तर देऊन ती अडचणीत येऊ शकते. पण समांथाने या प्रश्नाचं उत्तर दिलं.
आणखी वाचा : ओळखा पाहू बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री कोण? सलमान खानशी आहे खास कनेक्शन
समांथा म्हणाली, “मला काहीही विसरायचे नाही कारण प्रत्येक गोष्टीने मला आयुष्यात काहीतरी शिकवले आहे, त्यामुळे मला विसरायला आवडणार नाही. मला सगळं काही लक्षात ठेवायचे आहे कारण प्रत्येक गोष्टीने मला एक धडा दिला आहे.” समांथाबद्दल या चर्चा सुरूच असतात. मध्यंतरी नागा चैतन्यच्या डेटिंगबद्दल समांथाने वक्तव्य केल्याची गोष्ट समोर आली होती, नंतर स्वतः समांथाने पुढे येऊन तिने असं कोणतंही विधान केलं नसल्याचं सोशल मीडियावरुन स्पष्ट केलं.
नुकतंच समांथाने ‘पुष्पा’ चित्रपटात आयटम नंबर ‘ओ अंतवा’ करण्यास कुटुंब आणि मित्रपरिवाराने आपत्ती दर्शवल्याचं स्पष्ट केलं होतं. समंथा तिचा आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याच्या प्रमोशनसाठी ती कंबर कसून कामाला लागली आहे. सध्या ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. ‘शाकुंतलम’ १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सिटाडेल सीरिजच्या भारतीय रूपांतरणामध्येही समांथा दिसणार आहे.